
सावंतवाडी : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित कोकणातील पहिल्या भोसले सैनिक स्कूलचा भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा शनिवार, दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालय, भारत सरकार व सैनिक स्कूल सोसायटीची मान्यता प्राप्त असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग आणि कोकणवासीय सज्ज झाले आहेत.
हा कार्यक्रम भोसले नॉलेज सिटी, चराठे (वझरवाडी), ता. सावंतवाडी येथे होणार आहे. सकाळी ९.०० वाजता भूमीपूजन व शिलान्यास सोहळा होणार असून प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघ चालक,रा.स्व.संघ, सिंधुदुर्ग डॉ. अरविंद कुडतरकर, प्रांत संघटन मंत्री, अ.भा.वि.प. कोकण नीरज चौधरकर, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद उपाध्यक्ष
ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद कोकण प्रांत अध्यक्ष मेजर विनय देगावकर आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच सकाळी ११.०० वाजता उद्घाटन समारंभ होणार असून प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री शश तथा पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर उपस्थित राहणार आहे.
यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत असून यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन, संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोंसले, अध्यक्षा अॅड. सौ. अस्मिता सावंत-भोंसले, आणि सचिव संजीव देसाई यांनी केल आहे.










