
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय वाचक स्पर्धा शनिवार दिनांक ०६ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आली या स्पर्धेत प्रथम क्रमांक गौरवी चंद्रकांत घाटे, द्वितीय क्रमांक प्रगती भूषण मुजुमदार-परांजपे, तर तृतीय क्रमांक प्रवीण विश्राम ठाकूर यांनी पटकावला.
स्पर्धेचे उदघाटन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखक गंगाराम गवाणकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य श्री. भरत गावडे, श्री. विठ्ठल कदम उपस्थित होते तर वाचक स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. किशोर वालावलकर व श्री. विजय ठाकर यांनी काम पाहिले. यावेळी श्रीम. शुभांगी खानोलकर, श्री. व सौ. चंद्रकांत घाटे तसेच ग्रंथालय कर्मचारी श्री. महेंद्र पटेल, सौ. रंजना कानसे, श्री. महेंद्र सावंत, श्री. गुरुप्रसाद वाडकर यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले. या स्पर्धेसाठी लेखक, नाटककार कै. गंगाराम गवाणकर (वस्त्रहरणकार) यांच्या साहित्यावर आधारित वाचक स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे प्रास्ताविक श्री. भरत गावडे तर आभार प्रदर्शन श्री. विजय ठाकर यांनी केले.











