
सावंतवाडी : तालुक्यातील कारिवडे येथील जागृत देवस्थान श्री देवी कालिका मातेच्या जत्रोत्सवानिमित्त आणि इन्सुली येथील श्री देवी माऊली पंचायत देवस्थान येथे विशाल परब व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वेदिका परब यांनी भेट देऊन सपत्नीक दर्शन घेतले. या मंगलमय वातावरणात विशाल परब यांनी देवी कालिका मातेचे दर्शन घेतले. यावेळी सौ. वैदिका परब यांनी देवीची ओटी भरून गावच्या आणि परिसराच्या विकासासाठी आणि सुख-शांतीसाठी देवीला साकडे घातले. जत्रेनिमित्त आलेल्या अनेक ग्रामस्थांची आणि भाविकांची त्यांनी यावेळी आस्थेने विचारपूस केली.
तसेच इन्सुली येथील श्री देवी माऊली पंचायत देवस्थानालाही त्यांनी भेट दिली. तेथेही विधिवत पूजा करून त्यांनी देवी माऊली चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. दोन्ही ठिकाणी ग्रामस्थांकडून विशाल परब आणि सौ. वेदिका परब यांचे स्वागत करण्यात आले. गावातील जत्रा आणि देवस्थाने ही आपली संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम करतात. अशा पवित्र ठिकाणी नतमस्तक होऊन आत्मिक समाधान लाभले अशा भावना विशाल परब यांनी यावेळी व्यक्त केल्या.










