
सावंतवाडी : सत्ताधाऱ्यांच्या अमिषाला जनता बळी पडणार नाही. धुतल्या तांदळाचे दोन्ही पक्ष नाहीत. दोघांनीही पैशांच वाटप केलं. पैशाचा कितीही पाऊस पडला तरी शिवसेनेचा विजय हा निश्चित आहे असा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी व्यक्त केला. शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावरील बूथवर जाऊन रुपेश राऊळ यांनी कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेतल्या. यावेळी मदन राणे, संदेश राणे, ऑल्विन लोबो, सिद्धेश कासार,संजय गवस, संजय सुतार, रमेश गावकर, राजू शेटकर, विनोद काजरेकर,विनोद ठाकूर, प्रशांत बुगडे, आदी उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह नगरसेवक पदासाठीचे उमेदवार जिंकतील असा विश्वास व्यक्त केला.










