
सावंतवाडी : माजी मंत्री, आम. दीपक केसरकरांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. सावंतवाडीकरांचा प्रतिसाद बघता चांगला निकाल येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खंडपीठाचा निर्णय मान्य करावा लागेल. पैशांचा राजरोसपणे होणारा वापर चुकीचा आहे. लोकशाहीला मारक अशी ही घटना आहे. पैसे वाटपाचा प्रकार चुकीचा आहे. निवडणूकीच्या दिवशी ते होत असल्यास योग्य नाही. बाहेरून येणाऱ्यांना प्रतिबंध केला असता तर हे घडलं नसतं असं मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले.
तसेच निकाल चांगला येईल असा विश्वास आहे. पैसेवाटपाचा थोडाबहुत परिणाम होतो. मात्र, सावंतवाडीत होईल असं वाटत नाही. त्या बॅगा कपड्यांच्या होत्या. सिंधुदुर्गनंतर सोलापूर दौऱ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. प्रवास करताना स्वतःचे कपडे सोबत घ्यावे लागतात. त्यावरून होणारी टीका निंदनीय आहे. महायुती एकत्र रहावी अशी अपेक्षा आहे. पुढच्या निवडणुका तशा व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. दुरावा कमी व्हावा यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. पैशांच असं वाटप यापूर्वी कधीही झालेल नव्हतं. हा प्रकार निंदनीय आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पैशांच वाटप करुन निवडणूका जिंकायच्या असतील तर त्यात अर्थ राहणार नाही असं मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, दिपाली सावंत, आबा केसरकर आदी उपस्थित होते.










