
सावंतवाडी : भाजपकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचे पुरावे आहेत. पोलिस निरीक्षकांशी मी बोललो आहे. आंबोली, चौकुळ, बांदा भागातील अशी शहराबाहेरील माणसं आलीत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडली तर पोलिस अधिक्षक जबाबदार राहतील असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, पोलिस अधिक्षकांनी बाहेरून आलेल्या माणसांवर कारवाई करावी. तात्काळ त्यांना हटविण्यात यावेत असे मत व्यक्त केले. तसेच शिवसेनेच्या उमेदवारांचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उमेदवार देव्या सूर्याजी, शर्वरी धारगळकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते










