दीपक केसरकर ३ डिसेंबरनंतर सावंतवाडीत असणार का ? : विशाल परब

Edited by: विनायक गांवस
Published on: December 01, 2025 21:30 PM
views 96  views

सावंतवाडी : देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे. सावंतवाडीतही सत्ता हवी आहे. आमचे नगराध्यक्ष, नगरसेवक 'नॉन-करप्टेड' असतील‌‌. शहराचा विकास साधण्यासाठी संपूर्ण सावंतवाडीला 'भाजपमय' कराव असं आवाहन भाजप युवा नेते विशाल परब यांनी केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‌

तसेच आमदार दीपक केसरकर ३ डिसेंबरनंतर सावंतवाडीत असणार का ? ते मुंबईला जातील याचा विचार सावंतवाडीकरांनी करावा, असे विधान त्यांनी केले. गेली २५ वर्षे या मतदारसंघात जैसे थे अशीच सगळी कामे आहेत. त्यामुळे आता सर्व नागरिकांनी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आली आहे. विकासाची गंगा आणण्यासाठी सर्वानी एकत्र राहून विकास होऊ शकतो. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वामुळे सावंतवाडीचा विकास मागे राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मी कोणावरही टीका करणार नाही आणि केली पण नाही. माझा पराभव झाला तरी मी लोकांत काम करीत आहे. असेही ते म्हणाले.