केसरकरांचं भाषण ऐकून दुःख : लखमराजे भोंसले

राजकारणासाठी चुकीच्या गोष्टी सांगण योग्य नाही
Edited by: विनायक गांवस
Published on: December 01, 2025 21:17 PM
views 106  views

सावंतवाडी : भाजपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व नगरसेवक पदासाठीचे उमेदवार जिंकतील असा विश्वास युवराज लखमराजे भोंसले यांनी व्यक्त केले. तसेच राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी संजू परब यांनी माझ्या सुनेवर व महिलेवर टीका करताना नीट शब्द वापरावे. विचार करून टीका करा, महिलांवर टीका कराल तर ते चालणार नाही असा इशारा त्यांनी दिला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

युवराज लखमराजे भोंसले म्हणाले, दीपक केसरकर आमच्या जवळचे आहेत. पण, त्यांच भाषण ऐकून दुःख वाटलं. राजघराण्यावर टीका करणार नाही असं म्हणून टीका करतच आहे. या गोष्टी चुकीच्या आहेत. राजकारणासाठी चुकीच्या गोष्टी सांगण योग्य नाही. लोकांचा संभ्रम करणं योग्य नाही असं मत व्यक्त केले. दीपक केसरकर यांना उमेदवारी त्यांच्याकडून लढलो असतो तर हे मुद्दे दिसले नसते‌. दरवेळी रामराज्याचा, राजघराण्याचा ते उल्लेख करतात. आम्ही देखील लोकांसाठी काम करतो. मोती तलाव हा निवडणूकीचा मुद्दा नाही, ते लोकांचंच राहील. रेस्ट हाऊसचा ७/१२ राजघराण्याच्या नावावर आहे. केस घातली याचा अर्थ जमीन पाहिजे असं नाही. तांत्रिक गोष्टी सोडवण्यासाठी काही गोष्टी आहेत. राजघराण अडचण करत तर मल्टीस्पेशालिटी दुसरीकडे न्याव. पण, आम्ही अडचण करत नाही. विकासाच्या मुद्यावर सोडून होणारी टिका बघून दुःख वाटत आहे. लोकांनी दिलेल प्रेम बघून आनंद झाला‌. लोकांच्या संपर्कात ही मंडळी राहणार आहेत. त्यांच्या अडचणी सोडविण्याच काम ही मंडळी करतील. मल्टिस्पेशालिटी होणार आरोग्य सेवा सक्षम करण ही आमची जबाबदारी राहील. कोर्ट ऑर्डर काहीही झालं तरी ते सावंतवाडीचच राहिलं. केसरकर काय बोलले हे लोक विसरणार नाही. ही टिका राजघराण्यावर केलेली आहे‌, ती आयुष्यभर आहे. सर्वांत पहिल्यांदा त्यांनी ही टीका केलेली आहे. हॉस्पिटलसाठी आमची भूमिका आग्रही राहील. दीपक केसरकरांनी वकिलांचा सल्ला घेऊन बोलाव. ४ वकिल त्यांच्या पॅनेलमध्ये आहे.

दरम्यान, गेली ४० वर्ष या घराण्यात मी आहे. लोकांनी खूप प्रेम आम्हाला दिल. दीपक केसरकरांना नेहमीच मान दिला. या घरण्यान सावंतवाडीकरांना बरंच काही दिलं आहे. जनतेनं विचार करून मतदान करावं. संजू परब माझ्या सुनेला व महिलेवर टीका करू नका. नीट शब्द वापरा, इथे आलेल्या सगळ्या सुना विविध प्रांतातील आहे. टीका करताना विचार करून करा, महिलांवर टीका कराल तर ते चालणार नाही. जर तुमच्यासोबत युवराज्ञी असत्या तर एवढं तुम्ही बोलला नसता, दीपक केसरकर यानीही याचा विचार करावा असं मत राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी व्यक्त केले.