तब्येत ठीक नसल्याने पूर्वीप्रमाणे सगळीकडे जाऊ शकलो नाही

सर्वांनी आमच्यासोबत रहावं : दीपक केसरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: December 01, 2025 21:12 PM
views 56  views

सावंतवाडी : प्रचार अंतिम टप्प्यात आहे. लोकांचा प्रतिसाद बघता आमच्या पॅनलला यश मिळेल. माझा पाठिंबा दुसऱ्या कुणाला आहे असं सातत्याने म्हणणं योग्य नाही. माझा पाठिंबा शिवसेनेच्या अधिकृत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर यांना आहे असं मत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. तर नितेश राणेंच विधान चुकीच आहे. महायुतीतून आम्ही लढत होतो. त्यामुळे पालकमंत्र्यांनी केलेलं विधान हे चुकीच आहे‌. लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांनी याला बळी पडू नये असं आवाहन केसरकर यांनी केल.

ते म्हणाले, शहराचा विकास झपाट्याने सुरू आहे. विकासाला मतदान केल्यास आम्हाला अधिक मतदान होईल असा विश्वास माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. नारायण राणे यांनी देखील त्या प्रवृत्तीचा उल्लेख केला होता. माझा लढा व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती विरोधात आहे. मोती तलाव आपल्या मालकीचा आहे अशी याचिका आहे. त्यामुळे राजघराण्याचा विरोधात ही केस लढणार का ? यात कंफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट तयार होतो. त्यामुळे याबाबतची भुमिका त्यांनी जाहीर केली पाहिजे. एकदा निधी मंजूर झाला की त्याच वाटप मंत्री करतात. माझी तब्येत ठीक नसल्याने पूर्वीप्रमाणे सगळीकडे जाऊ शकलो नाही. काहीजणांना भेटण्याचा आज प्रयत्न केला. त्यामुळे सर्वांनी आमच्यासोबत रहावं असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर, श्रीधर पेडणेकर, परिक्षीत मांजरेकर आदी उपस्थित होते.