
ओरोस : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल ओरोस बुद्रुक या प्रशालेने आपला गुणवत्तेचा आलेख उंचावत यंदा वार्षिक परीक्षेत ९८ टक्के यशाची नोंद केली आहे. प्रशालेने नुकताच निकाल जाहीर केला असून यामध्ये कु. भावेश निलेश झाड याने ९७.४० टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
प्रशालेच्या निकालात पहिल्या तीन क्रमांकावर खालील विद्यार्थ्यांनी मोहोर उमटवली:
प्रथम क्रमांक: कु. भावेश निलेश झाड (४८७ गुण - ९७.४०%)
द्वितीय क्रमांक: कु. राखी अनिल मालवे (४६६ गुण - ९३.२०%)
तृतीय क्रमांक: कु. अथर्व अनिल शिंदे (४४७ गुण - ८९.४०%)
निकालाची वैशिष्ट्ये:
यावर्षी या परीक्षेसाठी प्रशालेतून एकूण ५० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी ४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक श्री. ए. एच. साईल तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.










