जिल्ह्यात दुपारी १.३० पर्यंत सरासरी ४४.७६ टक्के मतदान

सर्वाधिक ५२.८८ टक्के मतदान कणकवलीत
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: December 02, 2025 14:45 PM
views 53  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायत यांच्यासाठी सार्वत्रिक निवडणूक होत असून, आज यासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.दुपारी 1:30 वाजेपर्यंत  या चारही ठिकाणी मिळून सरासरी 44.76 टक्के एवढे मतदान झाले आहे.कणकवली मध्ये सर्वाधिक 52.88 टक्के एवढे मतदान.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायत यांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहेत. सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. सकाळी 7:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत या चारही ठिकाणी मिळून  सरासरी 44.76 टक्के एवढे मतदान झाले आहे. यामध्ये सावंतवाडी नगरपरिषदेसाठी आतापर्यंत 3811 पुरुष आणि 3945 महिला मिळून एकूण 7756 एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे. या ठिकाणी आतापर्यंत 39.92% एवढे मतदान झाले आहे. मालवण नगर परिषदेसाठी आतापर्यंत एकूण 3468 पुरुष आणि 3117 महिला मिळून एकूण 6585 जणांनी मतदान केले आहे या ठिकाणी 45.78% एवढे मतदान झाले आहे.वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये आतापर्यंत 2071 पुरुष आणि 2174 महिला मिळून एकूण 4245 जणांनी मतदान केले आहे या ठिकाणी 41.97% एवढे मतदान झाले आहेत. तर कणकवली नगरपालिकेसाठी आतापर्यंत 3530 पुरुष आणि 3491 महिला मिळून एकूण 7021 मतदारांनी मतदान केले आहे या ठिकाणी 52.88% एवढे मतदान झाले आहे. आत्तापार्यंत जिल्ह्यातील चारही ठिकाणी मिळून एकूण 12880 पुरुष आणि 12727 महिला मिळून एकूण 25607 एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्यात चारही ठिकाणी शांततेत मतदान सुरू असून जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणाही आपले काम व्यवस्थित बजावत आहेत.