जिल्ह्यात दुपारी साडे अकरा पर्यंत सरासरी २९ टक्के मतदान

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: December 02, 2025 12:35 PM
views 38  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायत यांच्यासाठी सार्वत्रिक निवडणूक होत असून, आज यासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.दुपारी 11:30 वाजेपर्यंत पहिल्या चार तासात या चारही ठिकाणी मिळून सरासरी 29 टक्के एवढे मतदान झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायत यांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहेत. सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. सकाळी साडेसात ते दुपारी 11:30 वाजेपर्यंत या चारही ठिकाणी मिळून सुमारे सरासरी 29 टक्के एवढे मतदान झाले आहे. यामध्ये सावंतवाडी नगरपरिषदेसाठी आतापर्यंत 2553 पुरुष आणि 2483 महिला मिळून एकूण 5036 एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे. या ठिकाणी आतापर्यंत 25.95% एवढे मतदान झाले आहे. मालवण नगर परिषदेसाठी आतापर्यंत एकूण 2375 पुरुष आणि 1986 महिला मिळून एकूण 4361 जणांनी मतदान केले आहे या ठिकाणी 30.32% एवढे मतदान झाले आहे.वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये आतापर्यंत 1354 पुरुष आणि 1194 महिला मिळून एकूण 2548 जणांनी मतदान केले आहे या ठिकाणी 25.19% एवढे मतदान झाले आहेत. तर कणकवली नगरपालिकेसाठी आतापर्यंत 2404 पुरुष आणि 2206 महिला मिळून एकूण 4610 मतदारांनी मतदान केले आहे या ठिकाणी 34.72% एवढे मतदान झाले आहे. गेल्या चार तासात जिल्ह्यातील चारही ठिकाणी मिळून एकूण 8686 पुरुष आणि 7869 महिला मिळून एकूण 16555 एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्यात चारही ठिकाणी शांततेत मतदान सुरू असून जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्र नाही आपले काम चौक बजावत आहे.