LIVE UPDATES

बांदा विभागातही उल्लेखनीय निकाल

Edited by: विनायक गांवस
Published on: May 08, 2026 20:07 PM
views 69  views

सावंतवाडी : बांदा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेच्या दुर्वा मुनेश वारंग हीने ९७. २० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला.‌ बांदा विभागातून तीने यश संपादन केलं आहे. १०० टक्के निकालाची परंपरा देखील कायम राखली आहे.

धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित खेमराज मेमोरीयल प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. एकूण ९१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रशालेतून प्रथम निखिल भिवाजी देसाई ९४.८० टक्के, द्वितीय ईश्वरी संतोष वावळीये ९४ टक्के आणि तनिष्का प्रशांत चिंदरकर, नित्या अजय महाजन व सारा शाहिद शेख ९२.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्था कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, समन्वयं समिती सचिव सौ. रश्मी तोरसकर यांच्यासह संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले.

बांदा नाबर स्कुल येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेचा निकाल सलग १९ व्या वर्षी १०० टक्के लागला आहे. प्रशालेतून १९ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. प्रशालेतून दुर्वा मुनेश वारंग हीने ९७. २० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला. द्वितीय सुयश संदीप गावकर (९५.४०), तृतीय अनुष्का रामचंद्र तेली (९५.२०), चतुर्थ साक्षी भूषण गवंडी (९४.६०) तर वेदा सुनील सावंत (९४.२०) हीने पाचवा क्रमांक संपादन केला.

सलग १९ वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा प्रशालेने कायम राखत आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. प्रशालेच्या यशाबद्दल संस्था चेअरमन मंगेश कामत, संस्था कार्यकारिणी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

डोंगरपाल हायस्कुल  श्री माऊली विद्यामंदिर  डोंगरपाल प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम सानिका बाबलो बोडेकर ८७.८० टक्के, द्वितीय नंदिनी नागेश कुबल ८७.२० टक्के,  तृतीय गौरी आपा  गवस ८४.६० टक्के. सर्व  उत्तीर्ण  विद्यार्थ्यांचे व पालकांचे  संस्था व प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली 

विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीचा निकाल ९७.८७ टक्के लागला. यामध्ये प्रथम क्रमांक गौरांगी गणेश राणे ९२.४० टक्के, द्वितीय नूजत  नासिर शेख ९० टक्के, तृतीय सुस्मिता सुनील सावंत ८९.२० टक्के. एकूण ४७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष महेंद्र सावंत, सचिव गुरुनाथ पेडणेकर, संचालक महेंद्र पालव, मयुर चराटकर यांनी अभिनंदन केले.

 दिव्यज्योती  प्रशालेने दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत ९६.७७ निकालाची नोंद केली आहे. प्रथम स्वरा सातार्डेकर ९४.२० टक्के, द्वितीय समृद्धी परब ९३.४० टक्के, तृतीय ख़ुशी शेख  ९२.४० टक्के. लागला.