LIVE UPDATES

मालवण तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.७६ टक्के

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 08, 2026 20:20 PM
views 83  views

मालवण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत मालवण तालुक्याचा निकाल ९८.७६ टक्के एवढा लागला आहे. तालुक्यातील २८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. 

मालवण तालुक्यातील एकूण ३५ शाळांमधून दहावीच्या परीक्षेसाठी ९७४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ९६२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९८.७६ टक्के लागला आहे. यामध्ये २८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. 

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ३५७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली आहे. तर ३६२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, २०१ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर ४२ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी प्राप्त केली.