
कणकवली : कणकवली हुंबरठ फोंडा मार्गावर पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी बांधकाम विभागाला ताबडतोब खड्डे बुजवण्याचा आदेश दिले होते आणि त्यामुळेच आज हा रस्ता खड्डे मुक्त झाला आहे त्यामुळे फोंडा घाट वासीय समाधान व्यक्त करत आहेत.
कणकवली कार्यकारी अभियंता दिनेश बागुल यांनी देखील या खड्डे मे रस्त्याची पाहणी केली होती हुंबरठ फोंडा रस्त्याला वळणावरच तीन ते चार फुटाचा मोठा खड्डा पडला होता तो तातडीने बुजविण्यात आला होता त्यानंतर पाऊस कमी झाला आणि आता पूर्ण हा रस्ता खड्डे मुक्त झाला असल्याचे दिसत आहे.










