LIVE UPDATES

न्यू इंग्लिश स्कुल भेडशीचा १०० टक्के निकाल

Edited by: लवू परब
Published on: May 08, 2026 20:31 PM
views 193  views

दोडामार्ग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षा फेब्रुवारी 2026 चा निकाल नुकता जाहीर झाला असून प्रथम चैतन्य मंदार फातर्फेकर याला 95.60% गुण मिळाले आहेत. द्वितीय श्रीयोग राजेंद्र पाटील 91.60% तर तृतीय पौर्णिमा श्रद्धांजली गवस हिला 87.20% आणि रिया राजन अंधारी हिला 87.20 % गुण मिळून तृतीय क्रमांक दोन विद्यार्थ्यांनी मिळविला आहे.

प्रशालेत एकूण 43 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षक, पालक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.