
दोडामार्ग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षा फेब्रुवारी 2026 चा निकाल नुकता जाहीर झाला असून, शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळेची स्लेशा श्याम नाईक हिने 93.20% गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. द्वितीय आलेल्या भूमी हनुमंत सावंत हिने 93.00% मिळविले तर तृतीय गौरी तिलकांचन गवस हिने 87.20% गुण मिळविले आहे. प्रशालेचा 93.75 % एवढा निकाल लागला.
प्रशालेत एकूण 16 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी पंधरा विद्यार्थी पास झाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.










