LIVE UPDATES

देवगडमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 08, 2026 20:23 PM
views 137  views

देवगड : देवगड तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून,आज सायंकाळी ६  वाजण्याच्या सुमारास आलेल्या सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढले. पाऊस झाल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली.

​गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झालेला जाणवत होता.परंतु काल गुरुवारी जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्याने नुकसान झाले होते.आज पुन्हा दुपारनंतर आकाशात काळे ढग जमा झाले आणि सायंकाळच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांच्या लखलखाटासह पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारपेठेत आलेल्या लोकांची, ग्राहक ,विक्रेते व्यावसायिक आणि घरी परतणाऱ्या नोकरदारांची चांगलीच तारांबळ उडाली.त्यामुळे विज पुरवठा देखील खंडित झाला आहे.देवगड तालुक्यातील गटारातून पाणी वाहून जात होते. या पावसामुळे आंबा बागायतदारांची मात्र तारांबळ उडालीय झालेल्या ​वादळी वाऱ्यासह पावसामुळे बागायतींचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.