
देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले कला वाणिज्य महाविद्यालयात 3 डिसेंबर रोजी आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला . ही कार्यशाळा रिझर्व बँक ऑफ इंडिया, नाबार्ड आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या साह्याने धान फाउंडेशन अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत धान फाउंडेशनचे समन्वयक सहदेव परब तसेच ध्यान फाउंडेशनचे सहाय्यक साक्षी परब व प्रसाद कोरलेकर उपस्थित होते.
कार्यक्रमास धान फाउंडेशनचे समन्वयक सहदेव परब मार्गदर्शन करताना सांगितले की, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याने आर्थिक नियोजन कसे करावे, तसेच डिजिटल बँकिंग याविषयी विद्यार्थ्यांना परिपूर्ण ज्ञान दिले गेले, तरच ते भविष्यात आर्थिक दृष्ट्या सजग होऊन स्वावलंबी बनतील. त्याचप्रमाणे विमा व विम्याचे फायदे व तोटे या विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत कला आणि वाणिज्य विभागातील सुमारे 45 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका अक्षता मोंडकर व सर्व प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकॅडमी कॉर्डिनेटर प्राध्यापिका सिद्धी कदम यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांनी केले.











