LIVE UPDATES

आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूलचा निकाल 100%

Edited by: विनायक गांवस
Published on: May 08, 2026 19:38 PM
views 70  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, आरोस येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत कुमारी अक्षता धोंडू झोरे ८८.६० टक्के गुणांसह विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.द्वितीय क्रमांक कु. अश्मि संतोष पिंगुळकर, ८५.००% तृतीय क्रमांक कुमार नैतिक लक्ष्मण घोगळे ७६.८०% यांने प्राप्त केला. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.