
मालवण : मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून 10 प्रभागात 20 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या निवडणुकीसाठी 14 हजार 385 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
प्रभाग निहाय मतदान केंद्र :
प्रभाग 1, 1 नंबर मधील मतदान स. का. पाटील कॉलेज मधील एनसीसी गर्ल्स युनिट मध्ये असणार आहे. यात 389 पुरुष तर 388 महिला, असे 777 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रभाग 1 मधील दोन नंबर मतदान केंद्र हे स. का. पाटील कॉलेजच्या एफवायबीएच्या वर्गात असणार आहेत. या केंद्रात 372 पुरुष, 404 महिला असे एकूण 776 मतदार असणार आहेत. प्रभाग 1 मध्ये एकूण 1,553 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
प्रभाग क्रमांक 2 मधील एक नंबर मतदान केंद्र हे रेवतळे शाळेतील सभागृहात असणार आहे. 367 पुरुष तर 373 महिला असे एकूण 740 मतदार आहेत. प्रभाग 2 मधील दोन नंबर मतदान केंद्र हे रेवतळे शाळेतील तिसरीच्या वर्गात असणार आहे. 347 पुरुष मतदार तर 393 महिला मतदार असे एकूण 740 मतदार असणार आहेत. प्रभाग दोन मधील दोन्ही मतदान केंद्रावर 1480 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
प्रभाग क्रमांक 3 मधील 1 नंबर मतदार केंद्र हे देऊळवाडा शाळेतील सभागृहात असणार आहे. या केंद्रावर 261 पुरुष तर 285 महिला असे एकूण 546 मतदार आहेत. प्रभाग 3 मधील 2 नंबर मतदान केंद्र हे वायरी शाळेत असणार आहे. या केंद्रावर 271 पुरुष तर 268 महिला असे एकूण 539 मतदार असणार आहेत. प्रभाग 3 मधील दोन्ही केंद्रावर एकूण 1,085 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
प्रभाग 4 मधील एक नंबर मतदान केंद्र हे पतन कार्यालयातील उत्तरेच्या बाजूस असणारे कार्यालय आहे. या केंद्रावर 303 पुरुष तर 283 महिला असे एकूण 586 मतदार असणार आहेत. प्रभाग 4 मधील 2 नंबर मतदान केंद्र पतन कार्यालयातील दक्षिणेच्या बाजूस असणाऱ्या कार्यालयात असणार आहे. या केंद्रावर 277 पुरुष तर 310 महिला मतदार असे एकूण 587 मतदार असणार आहेत. प्रभाग 4 मधील दोन्ही केंद्रावर एकूण 1173 मतदार मतदानाचा हक्क बाजवणार आहेत.
प्रभाग क्रमांक 5 मधील 1 नंबर मतदान केंद्र हे टोपिवाला हायस्कुलच्या दहावी अ या वर्गात असणार आहे. या केंद्रावर 329 पुरुष तर 348 महिला असे एकूण 677 मतदार असणार आहेत. प्रभाग 5 मधील दुसरं मतदान केंद्र हे टोपिवाला हायस्कुलच्या दहावी ब या वर्गात असणार आहे. या केंद्रावर 327 पुरुष तर 350 महिला असे एकूण 677 मतदार असणार आहेत. प्रभाग 5 मधील दोन्ही केंद्रावर एकूण 1,354 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
प्रभाग 6 मधील 1 नंबर मतदान केंद्र हे ए. बा. से. योजना कार्यालयाच्या सभागृहात असणार आहे. या केंद्रावर 372 पुरुष तर 425 महिला असे एकूण 797 मतदार असणार आहेत. प्रभाग 6 मधील 2 नंबर केंद्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रकल्प खोलीत असणार आहे. या केंद्रावर 389 पुरुष तर 402 महिला असे एकूण 791 मतदार असणार आहेत. प्रभाग 6 मध्ये 1,588 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
प्रभाग क्रमांक 7 मधील 1 नंबर मतदान केंद्र हे देसाई स्कुल मधील मुख्य सभागृहा मध्ये असणार आहे. या केंद्रावर 389 पुरुष तर 449 महिला असे एकूण 838 मतदार असणार आहेत. प्रभाग 7 मधील 2 नंबर केंद्र हे पंचायत समितीच्या मुख्य सभागृहात असणार आहे. या केंद्रावर 408 पुरुष तर 436 महिला असे एकूण 844 मतदार असणार आहेत. दोन्ही केंद्रावर एकूण प्रभाग 7 मध्ये 1,682 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
प्रभाग क्रमांक 8 मधील 1 नंबर मतदान केंद्र हे भंडारी हायस्कुलच्या नववी अ या वर्गात असणार आहे. या केंद्रावर 313 पुरुष तर 313 असे असे एकूण 626 मतदार असणार आहेत. प्रभाग 8 मधील 2 नंबर केंद्र हे भंडारी हायस्कुलच्या 11 वी विज्ञान वर्गात असणार आहे. या केंद्रावर 300 पुरुष तर 326 महिला असे एकूण 626 मतदार असणार आहेत. प्रभाग 8 मध्ये 1,252 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
प्रभाग 9 मधील 1 नंबर मतदार केंद्र हे दांडी शाळेच्या पश्चिम बाजूच्या वर्गात असणार आहे. या केंद्रावर 408 पुरुष तर 413 महिला असे एकूण 821 मतदार असणार आहेत. प्रभाग 9 मधील 2 नंबर केंद्र हे दांडी शाळेच्या दक्षिणेस असणाऱ्या वर्गात असणार आहे. या केंद्रावर 400 पुरुष तर 421 महिला असे एकूण 821 मतदार असणार आहेत. प्रभाग 9 मध्ये एकूण 1,642 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
प्रभाग क्रमांक 10 मधील 1 नंबर मतदान केंद्र हे अंबाजी विद्यालयाच्या अंगणवाडीच्या खोलीत असणार आहे. या केंद्रावर 392 पुरुष तर 397 महिला असे एकूण 789 मतदार असणार आहेत. प्रभाग 10 मधील 2 नंबर मतदार केंद्र हे अंबाजी विद्यालयाच्या सभागृहात असणार आहे. या केंद्रावर 368 पुरुष तर 419 महिला असे एकूण 787 मतदार असणार आहेत. प्रभाग 10 मध्ये एकूण 1,576 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.












