भांडण विकोपाला | पत्नीने ओतलं पतीच्या डोक्यावर उकळत तेल

पती गंभीर
Edited by:
Published on: October 07, 2025 20:37 PM
views 1388  views

बेळगाव : पत्नी स्वयंपाक करत असताना पती सोबत झालेल्या भांडणात पत्नीने रागाच्या भरात पतीच्या डोक्यावर उकळलेले कडईभर तेल टाकून गंभीर जखमी केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे घडली आहे.या घटनेत भाजून गंभीर जखमी झालेल्या पतीचे नाव सुभाष पाटील ( वय ५५ ) वर्षे असे असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी  समजलेल्या अधिक माहितीनुसार पती सुभाष पाटील-पत्नी वैशाली पाटील दोघेही माजी ग्रामपंचायत सदस्य होते. सोमवारी दुपारी पत्नी वैशाली घरात स्वयंपाक करत असताना पती सुभाष यांच्या सोबत झालेल्या किरकोळ भांडणातून रागाच्या भरा उकळलेले कढईभर तेल पतीच्या डोक्यात टाकले. या घटनेत सुभाष हे भाजून गंभीर जखमी झाले त्यांच्या डोक्याला डोळ्याला शरीरावर इतर ठिकाणी भाजून जखमा झाल्या आहेत.

तापलेले तेल अंगावर पडल्याने भाजून जखमी झालेल्या सुभाष पाटील यांनी त्रास सहन न झाल्याने पाण्याच्या टाकीत उडी टाकली होती अशी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानंतर लागलीच त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

गेल्या दोन वर्षा पासून या पती पत्नी दोघांमध्ये  बऱ्याचदा भांडणे होत होती सोमवारी पुन्हा भांडण झाले त्यावेळी रागाच्या भरत पत्नीने पतीवर हा जीवघेणा हल्ला केल्याने मच्छे गावात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान पत्नी वैशालीवर पतीवर जीवघेणा हल्ला केला प्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.